Pune Crime : ‘डेटिंग ॲप’च्या नादी लावून लुटणारे गजाआड

सोशल मिडियावर असलेल्या ‘डेटींग अॅप’च्या माध्यमातून तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून लूटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : सोशल मिडियावर असलेल्या ‘डेटींग अॅप’च्या माध्यमातून तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून लूटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या टोळीने पुणे शहरासह, ग्रामीण भागातील तरुणांना लुबाडल्याचे समोर आले आहे. 

सुशांत पोपट नागरे (वय २५), मयूर राजू गायकवाड (वय २४, दोघे रा. बोल्हेगाव, अहमदनगर) आणि श्रेयस भाऊसाहेब आंग्रे (२४, रा, नागापूर, अहमदनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी नागरे आणि गायकवाड सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध नगरमधील तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नगर रस्त्यावरील शिक्रापूर परिसरात ९ ऑक्टोबर रोजी एका तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. त्याला मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुशांत नागरे, मयूर गायकवाड, श्रेयस आंग्रे यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून कार जप्त करण्यात आली आहे. 

पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षकअविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे दीपरत्न गायकवाड, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest