पुणे : बेदरकार पीएमपी चालकाने महिलेला चिरडले

भरधाव ‘पीएमपीएमएल’ बसची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडला.

Accident News

संग्रहित छायाचित्र

पुणे : भरधाव ‘पीएमपीएमएल’ बसची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात चालकावर भादवि २७९, ३०४ (अ), ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Accident News) 

काशीबाई पांडुरंग खुरंगुळे (वय ६०, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालक दिलीपराव वामनराव लहाणे (वय ५०, रा. मांजरी रस्ता, गोपालपट्टी, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरंगुळे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीबाई या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बसथांब्याजवळ उभ्या होत्या. त्या लहाणे चालवीत असलेल्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. पाठीमागील दरवाजामधून बसमध्ये चढत असतानाच चालकाने ही बस सुरू केली आणि हलगर्जीपणाने पुढे नेली. त्यावेळी काशीबाई खाली पडल्या. 

त्यावेळी अबसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेले. त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवरून चाक गेल्याने हा पाय तुटला. तर, उजव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. पा अपघातात गंभीर जखमी झालेल्या काशीबाई यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest