पुणे : लष्कर भागातील शाळेमध्ये मुलावर अनैसर्गिक बलात्कार; अल्पवयीन विद्यार्थ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शाळेमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शाळेमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लष्कर भागातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेमध्ये मे २०२४ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. 

पिडीत मुलाची फिर्याद पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा आणि आरोपी मुलगा एकाच शाळेत शिकण्यास आहेत. मे महिन्यात पीडित मुलगा शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहात गेलेला होता. त्यावेळी आरोपी मुलाने त्याला धमकी देत त्याला कपडे काढायला लावले. त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर, त्याने या मुलाला धमकावत वेळोवेळी त्याच्यावर अत्याचार केले. त्याचा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित मुलाने त्याच्या आईवडिलांसह शिक्षकांना माहिती दिली. 

शाळेने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो), तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी शाळेस भेट देत मुलाला धीर दिला. पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव तपास करत आहेत.

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन युुवतीवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तसेच दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते. कोंढवा भागातील एका सोसायटीच्या आवारात मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest