Pune : तब्बल आठ हजार कोटींची कर चुकवेगिरी; अडीचशे बनावट कंपन्यांच्या आधारे जीएसटीत फसवणूक

पुण्यात जीएसटीच्या कर चुकवेगिरीचा नवा प्रकार समोर आला आहे. यासाठी बनावट नावांनी २४६ कंपन्या स्थापन करण्यात आल्या. ज्यांना कर चुकवायचा आहे, अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे ही कर चुकवेगिरी करण्यात आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गुजरातच्या मुख्य सूत्रधाराने बनावट कागदपत्रांचा वापर करून केले कृत्य

पुण्यात जीएसटीच्या कर चुकवेगिरीचा (tax evasion) नवा प्रकार समोर आला आहे. यासाठी बनावट नावांनी २४६ कंपन्या स्थापन करण्यात आल्या. ज्यांना कर चुकवायचा आहे, अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे ही कर चुकवेगिरी करण्यात आली.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाची फसवणूक करून तब्बल पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा कर चुकविण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जीएसटीच्या पुणे कार्यालयाने हा प्रकार उघडकीस आणत गुजरातमधून चालणारे रॅकेट मोडीत काढत आठ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. मुख्य सूत्रधाराला गुजरातमधून गजाआड करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून मार्च २०२४ दरम्यान हा प्रकार घडला.

अश्रफभाई इब्राहिमभाई कालवाडिया (वय ५०, रा. अल्टिमेट रान्डेर रोड, सूरत, गुजरात), नितीन भागोजी बर्गे (रा. ओम साई गणेश सोसायटी, कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), फैजल अब्दुल गफार मेवावाला (रा. बुर्ज अश्रफी, कांबेकर स्ट्रीट, मुंबई), निजामुद्दीन मोहम्मद सईद खान (रा. मराठी हायस्कूलच्या मागे, दिवा रस्ता, भिवंडी), अमित तेजबहादूर सिंग (रा. सेंच्युरी रेयॉन कॉलनी, मुरबाद रोड, उल्हासनगर, मुंबई), राहुल बटुकभैय्या बरैय्या, कौशिक भूपतभाई मकवाना, जितेंद्र मुकेशभाई गोहेल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटीच्या तपास पथकाचे अधिकारी ऋषी प्रकाश (वय ३९) यांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील कालवाडिया याला अटक करण्यात आली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटीकडून (GST) विविध आस्थापच्या व्यवहारांची आणि खात्यांची तपासणी केली जाते. ऑक्टोबर २०२३ मध्ये जीएसटी कार्यालयाने पठाण एन्टरप्रायजेस या कंपनीच्या खात्यांची ऑनलाईन तपासणी करण्यात आली होती. त्यावेळीन्या कंपनीमार्फत कोणत्याही प्रकारची मालखरेदी आणि विक्री होत नसल्याचे समोर आले. तरीदेखील केवळ देयके (बिल) तयार केली जात होती. तपासणीमध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जीएसटीच्या तपास पथकाने या कंपनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. हडपसरच्या शेवाळवाडी परिसरात पठाण एंटरप्रायजेसचे कार्यालय असल्याचे नमूद करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी जाऊन पाहिले असता जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता बनावट असल्याचे आढळून आले.

ही कंपनी पठाण शब्बीर खान अन्वर खान याच्या नावावर नोंदविण्यात आलेली होती. त्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी खान गुजरातमधील भावनगरमध्ये राहात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. भावनगरमध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो रिक्षाचालक असल्याचे समोर आले. तसेच, या कंपनीबाबत काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितल्यावर अधिकारीदेखील चक्रावले.

या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला. ऑनलाइन विश्लेषणामध्ये अधिकाऱ्यांच्या हाती एक मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी मिळाला. त्यावर काही कंपनी, तसेच आस्थापना जीएसटीकडे नोंदणीकृत केल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी या कंपनीसाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्याचा शोध घेतला. हे खाते जित कुकडिया याच्या नावावर होते. त्याचा शोध घेऊन चौकशी केली असता तो सुरक्षारक्षक असल्याचे समोर आले. कुकडिया याने त्याचे हे खाते ओळखीच्या कौशिक मकवाना आणि जितेंद्र गोहेल यांच्यासाठी उघडल्याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी तपासाची एक एक पदर जोडण्यास सुरुवात केले. तपासपथकाने पुणे, मुंबई, तसेच राजकोट, भावनगर या ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर, जीएसटीकडून या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करत आहेत.

२१ मोबाईल, ११ सीमकार्ड जप्त

अश्रफ कालवाडिया हाच पठाण एन्टरप्रायजेस आणि इतर बनावट नावाने हे रॅकेट चालवित असल्याचे उघड झाले. त्याचा माग काढत मीरा भाईंदरमधील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २१ मोबाईल, दोन लॅपटॉप, ११ सीमकार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका, वेगवेगळ्या कंपनीच्या नावाचे रबरी शिक्के जप्त करण्यात आले. त्याला अटक करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest