Pune News : बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी 'श्रीनाथ डेव्हलपर्स'विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका जमीन विकसकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ डेव्हलपर्स असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जमीन विकसकाचे नाव आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने दिली तक्रार

पुणे : शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका जमीन विकसकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ डेव्हलपर्स (Srinath Developers) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जमीन विकसकाचे नाव आहे. 

या प्रकरणी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे निरीक्षक युवराज वाघ (वय ३४, रा. धनकवडी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीनाथ डेव्हलपर्स या नावाचा फलक असलेल्या विकसकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ वर्षांपासून विश्वसनीय असे व त्याखाली संस्थेच्या लोगोमध्ये इमारतीचे छायाचित्रात श्रीनाथ डेव्हलपर्स  प्रा.लि असे नाव लिहिलेले आहे. तसेच पुणे परिसरात १ ते ११ गुंठे व १ ते १०० एकराचे व्यवहार खात्रीशीर व आनंदाने व विश्वासाने खरेदी विक्री केली जाईल. असे फ्लेक्सवर नमूद करण्यात आले आहे. ९१४६०१५५९९ हा मोबाईल क्रमांकही नमूद करण्यात आला आहे.  असे फ्लेक्स लावताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच परवाना पोटी कोणतेही शु्ल्क भरलेली नाही. असे फ्लेक्स लावल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकल्याप्रकरणी या डेव्हलपर्सच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात ( Sinhagad road police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील झाडांवर तसेच विद्युत खांबावर अल्पवयीन मुलांकडून जमीन खरेदी विक्री अशी जाहिरात करणारे फ्लेक्स लावण्यात येते होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हे पाहणीत दिसून आले. त्यांनी तात्काळ या मुलांना ताब्यात घेवून हे फ्लेक्स लावण्यास कोणी सांगितले, मालकाचे नाव काय आहे, अशी विचारणा केली. परंतु ती मुलांना अश्रू अनावर झाले. तसेच घाबरल्याने आणि अल्पवयीन असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या डेव्हलपर्सच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिकेची सोयीची भूमिका 
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात इच्छुक उमेदवारांनी शहराच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात जाहिरातबाजी केली होती. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फ्लेक्स काढून घेण्याची हिम्मत झाली नाही. पुणेकरांनी वांरवार तक्रार करुन देखिल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात तसेच डोळ्यावर काळी पट्टी बांधली होती. आचारसंहिता लागू झाल्यानतंरही फ्लेक्स काढण्यास आकाशचिन्ह विभागा शक्य नाह. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर तसेच मुदत दिल्यानंतर फ्लेक्स काढण्याची विभागाला कसरत करावी लागली. मात्र एकाही फ्लेक्स लावणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास महापालिकेचे अधिकारी धजावले नाहीत. पण एका जमीन विकसकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन महापालिकेने सोयीची भूमिका घेतली असल्याचा आरोप पुणेकरांकडून केला जाऊ लागला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest