पुणे: भवानी पेठेतून गांजा विक्री करणाऱ्यास अटक

पुणे: गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने भवानी पेठ येथून अटक केली. इसाक जैनुद्दीन शेख (वय ५३, रा.चमडी गल्ली, भवानी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 3 Oct 2024
  • 08:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने भवानी पेठ येथून अटक केली. इसाक जैनुद्दीन शेख (वय ५३, रा.चमडी गल्ली, भवानी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबरला भवानी पेठ येथील नवलखा बिल्डींगच्या समोर गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक १ मधील अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक संशयास्पद व्यक्ती आढळून आला. या व्यक्तीच्या हातात एक नायलॉनची पिशवी होती. हा व्यक्ती कोणाचीतरी वाट बघत होता. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली. या व्यक्तीने त्याचे नाव इसाक जैनुद्दीन शेख  असल्याचे सांगितले. शेख याच्याकडे असलेल्या नायलॉनच्या पिशवीची तपासणी केली असता १८ हजार १६० रुपयांचा ९०८  ग्रॅम गांजा, ११ हजार १५० रुपयांची रोख रक्कम असा २९ हजार ३१० रुपयांचा ऐवज तसेच १५ प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या आढळून आल्या. हा ऐवज शेख याने बेकायदशीर रित्या विक्री करण्यासाठी बाळगला म्हणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई  पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक १  मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, नुतन वारे व योगेश मोहिते यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest