संग्रहित छायाचित्र
पुणे : घरासमोर खेळत असलेल्या गतीमंद मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने या मुलीला चॉकलेट खाण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत अत्याचार केला. हा प्रकार हडपसरमध्ये घडला.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राजनाथ (वय ३७) नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (आय) (के) (एम), ६५ (१), ३५१ (२) सह कलम ४, ५ (के) (एल), ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पिडीत मुलगी गतीमंद आहे. ती घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला खाऊसाठी पैसे देतो असे सांगत उचलून सोसायटीमधील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिली.