Pune Crime News: धनकवडीत वाहनांची तोडफोड, कोयत्याचा धाक दाखवून माजवली दहशत

पुणे : शहरातील जनता वसाहतीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच धनकवडीतील गणेश चौक परिसरात अशी एक घटना घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Sun, 13 Oct 2024
  • 07:13 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

धनकवडीत वाहनांची तोडफोड, कोयत्याचा धाक दाखवून माजवली दहशत

पुणे : शहरातील जनता वसाहतीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच  धनकवडीतील गणेश चौक परिसरात अशी एक घटना घडली आहे. शनिवारी (दि. १२) रात्री टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनां ची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 

याप्रकरणी सूरज बंडू शेंडकर (वय ५४, रा. शेलार चाळ, गणेश चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादीनुसार टोळक्यााविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुचाकीवरुन टोळके आले. आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादी लागणाऱ्या सोडणार नाही, अशी धमकी देत कोयते उगारून दहशत माजविली. या परिसरातील एका तरुणाचा शोध घेण्यासाठी आलेल्या आरोपींनी शेंडकर यांच्या रिक्षाची काच दांडक्याने फोडली. या भागातील रहिवासी राजेश कुंजीर यांच्या मोटारीची काच फोडली, तसेच दोन दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार करत आहेत.

पुणे शहरात दहशत माजवण्याचे प्रकार सुरुच असून याला पुणेकर चांगलेच त्रासले आहेत. भर दिवसा खून, महिलांवरील अत्याचार, ड्रग्स प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे दिसून येत आहे. गल्ली बोळात भाई तयार होऊ लागले आहेत. किरकोळ कारणावरुन रस्त्यावर लावेल्या वाहनांची थेट तोडफोड केली जाऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात गाड्यांच्या तोडफोडीची गंभीर प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा जास्त सहभाग असल्याचे उघड होत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांपुढे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest