Pune Crime News: बनावट नोटा बाळगणारा गजाआड; तब्बल २५० नोटा पोलिसांनी केल्या जप्त

पुणे : बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Fri, 11 Oct 2024
  • 08:11 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बनावट नोटा बाळगणारा गजाआड; तब्बल २५० नोटा पोलिसांनी केल्या जप्त

पुणे : बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

निलेश हिरानंद वीरकर (वय ३३, रा. विष्णू गावडे चाळ, चिंचवड रेल्वे स्थानकासमोर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल पवार, महेश मंडलिक गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आरोपी पीएमपी बस थांबा परिसरातून संशयास्पद अवस्थेत जाताना दिसला. पोलिसांना त्याच्याविषयी संशय आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या झडतीमध्ये ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्याने या बनावट नोटा कुठून आणल्या? त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पद्मनाळे यांनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest