पुणे : सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना पकडून देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस

पोलिसांनी केली घोषणा : तीन हजार मोबाईलचा काढला डम्प डाटा, २०० संशयितांची चौकशी

Pune bopdev ghat rape

पुणे : बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले आहे. गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलीस अशी तब्बल २५ पथके तपास करीत आहेत. आता या आरोपींचा लवकरात लवकर शोध लागावा याकरिता पोलिसांनी आरोपीना पकडून देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. आरोपींच्या शोधासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. 

बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबत तसेच आरोपींना बाबत काही माहिती असल्यास तात्काळ कोंढवा पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष आणि गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान पोलिसांनी या भागातील जवळपास तीन हजार मोबाईल क्रमांकाचा डम्प डाटा काढला आहे. त्या आधारे देखील तपास सुरू आहे. यासोबतच पोलिसांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या वर्णनावरून आरोपींचे रेखाचित्र तयार केले आहे. त्याद्वारे देखील आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संशयीतांबद्दल कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आतापर्यंत २०० संशयित तरुणाची चौकशी करण्यात आल्याचे शर्मा म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest