पुणे: जेवताना ताटातले खाल्ल्याने मित्रानेच केला खून

पुण्यातील धायरी परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला असून यामध्ये पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 13 Oct 2024
  • 04:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील धायरी परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला असून यामध्ये पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य घोरपडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी मध्ये असणाऱ्या एका बारमध्ये आरोपी व आदित्य घोरपडे जेवण्यासाठी गेले होते. जेवण करत असताना एकमेकांच्या ताटातील अन्न खाण्यावरून त्यांच्यात वाद झाले आणि ते त्या हॉटेलमधून बाहेर पडले. याच वादाचे रूपांतर पुढे भांडणात झाले आणि या वादातून पाच ते सहा जणांनी मिळून मित्राचाच खून केला. 

आदित्य जेव्हा घराकडे निघाला त्यावेळी आरोपीने त्याच्या काही मित्रांना बोलावून घेतले आणि दगड व काठीच्या साहाय्याने आदित्यवर वार केले. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याच्या मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest