पुणे: ‘ट्रिपल तलाक’ प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिचे दागिने काढून घेतले. तिला तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द वापरुन तलाक देण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिचे दागिने काढून घेतले. तिला तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द वापरुन तलाक देण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट २००८ पासून १७ एप्रिल २०२४ पर्यंत घडला.  (Pune Crime News)

अब्दुल मन्नान नबीसाहब नदाफ (रा. रेडियंट हिल सोसायटी, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तसलीम अब्दुल मन्नान नदाफ (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला पतीने सतत काही ना काही कारणावरून भांडणे करून शिवीगाळ केली. हाताने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. मुलांना सोडून माहेरी जाण्यास सांगितले. तसेच, फिर्यादीच्या आईवडिलांनी त्यांना लग्नात घातलेले तीन तोळ्यांचे दागिने त्यांच्याकडून काढून घेतले. यातील काही  दागिने त्यांना परत करून उर्वरीत दगिन्यांचा अपहार केला. तसेच एप्रिल २०२३ या महिन्यात तीन वेळा तलाक शब्द उच्चारून तलाक दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Triple Talaq Case)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest