संग्रहित छायाचित्र
पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीच्या दोन सराईतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वडगाव येथील कॅनॉल रोडजवळ ही कारवाई करण्यात आली.
सूरज महेंद्र नांगरे (वय २१) आणि साहील मनीष सोनवणे (वय २२, रा. दोघे. किरकटवाडी, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अंमलदार तानाजी सागर, दत्ता मालुसरे, धनंजय गिरिगोसवी यांचे पथक हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी कॅनॉल रस्त्याजवळ जन संशयित उभे असल्याची माहिती अंमलदार सागर यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडतीमध्ये नांगरेच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. तर, सोनवणे याच्याकडे दोन काडतुसे मिळून आली.