पिंपरी-चिंचवड : चढ्या दराने आयपीएलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

चढ्या दराने आयपीएलच्या तिकीटाची विक्री करणाऱ्या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) चिंचवड येथे चापेकर चौकात केली गेली.

IPL tickets

संग्रहित छायाचित्र

चढ्या दराने आयपीएलच्या तिकीटाची विक्री करणाऱ्या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10)  चिंचवड येथे चापेकर चौकात केली गेली. (IPL ticket) 

चेतन नामदेव पाटील (Chetan Pail) (वय 25 रा.दिघी) व सचिन विनोद कुंभार (Sachin Kumbhar) (वय 21 रा. निगडी) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आकाश विजय साळवी (Akash Salvi) (वय 25 रा.दिघी) यांनी चिचंवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आयपील मॅचच्या तिकीटांचा साठा करून ते तिकीट मुळ रकमे पेक्षा जास्त रकमेने विकत काळा बाजार करत होते.  फिर्यादी यांना  ही विकण्याचा  प्रयत्न करुन 92 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडे याची तक्रार करताच पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest