पिंपरी चिंचवड: क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत २३ हजारांची फसवणूक

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची २२ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी माण रोड, हिंजवडी येथे घडली.

संग्रहित छायाचित्र

हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची २२ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी माण रोड, हिंजवडी येथे घडली.

विनीत मोहन अग्रवाल (वय ४३, रा. माण रोड, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युपीआय आयडी वापरणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अग्रवाल यांच्याशी इन्स्टाग्राम वरून संपर्क केला. अग्रवाल यांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यातील गुंतवणुकीवर दुपटीपेक्षा अधिक फायदा होईल, असे आमिष दाखवले. त्यातून अग्रवाल यांनी प्रथम पाच हजार त्यानंतर १७ हजार ९९९ रुपये असे एकूण २२ हजार ९९९ रुपयांची गुंतवणूक करत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest