पिंपरी-चिंचवड: पोलिसाला धडक देऊन वाहन चालक फरार; ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसाचा मृत्यू

पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. बंगळुरू – मुंबई महामार्गावर रावेत येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसाचा मृत्यू

पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. बंगळुरू – मुंबई महामार्गावर रावेत येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर वाहन चालक फरार झाला असून, ही घटना सोमवारी (१५ एप्रिल) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

सचिन नरुटे (Sachin Narute) (वय 38, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे

सचिन नरुटे हे देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) कार्यरत होते. सोमवारी डे शिफ्ट झाल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले. बंगळुरू-मुंबई महामार्गावरून (Bangalore-Mumbai Highway) वाकडकडे जात असताना रावेत येथे त्यांच्या दुचाकीला (एमएच 14/जीव्ही 7750) भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

नरुटे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest