मित्रांनी केली लाखोंची फसवणूक; कापड व्यावसायिकाचीआत्महत्या

पुणे : गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळतमित्रांकडूनच आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यात गेलेल्या एका कापड व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळतमित्रांकडूनच आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यात गेलेल्या एका कापड व्यावसायिकाने (textile businessman) गळफास घेत आत्महत्या (suicide) केली. ही घटना भवानी पेठेमध्ये (bhawani peth) घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमजान अली साचे (वय ४४, रा. भवानी पेठ) हे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. सुनील बेले, अफसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर, संजीव बजारमठ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साचे यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर, त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. आरोपी आणि रमजान यांची ओळख होती. त्यांनी मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 

रमजान यांनी या गुंतवणुकीसाठी बँकेतून कर्ज काढले. आरोपींनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. आरोपींनी त्यांना त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest