आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे काढला काटा, शहरात खळबळ
पुणे: आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे (Immoral relationship) मनात राग होता. यामुळे मुलगा आणि आईचा प्रियकर यांच्यात वाद होता. याच रागातून आईच्या प्रियकराच्या डोक्यात फरशी व दगड घालून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. (Pune Crime)
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय २८, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच दोन्ही आरोपी देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एकावर मार्केट यार्ड येथील एकावर व्यापाऱ्याला अपहरण (कलम ३९५) केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे, तर दुसऱ्यावर खूनाचा प्रयत्न (३०७) केल्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. मयत तरुणाचे एका आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी आणि मयत तरुण यांच्यात एकदा वाद झाला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्यात वाद होत होते. मयताने अनेक वेळा आरोपीला मारहाण केली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक व आरोपी सोनू, आयुष गप्पा मारत थांबले होते. आरोपींनी दारू प्याली होती. त्यावेळी आरोपी व प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि आयुष यांनी प्रतिकच्या डोक्यात फरशी मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. आरोपींनी प्रतीकचा खून वैमनस्यातून केल्याचा संशय आहे. त्यानुसार एकाला अटक करण्यात आली असून एकाल बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश जगताप करीत आहेत.
नर्हेच्या डोंगरावर तरुणाचा खून...
नर्हे परिसरातील डोंगरावर सकाळी रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात मारहाणकरून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, त्याच्या खूनाचे कारण व आरोपी अज्ञात आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा माग काढला जात आहे.