संग्रहित छायाचित्र
कल्याण पश्चिममधील रोहिदास वाडा परिसरात केवळ 500 रुपयांच्या वादातून सख्या भावाने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी भावाने धारदार चाकूने भावाचा जीव घेतल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
कल्याण पश्चिम येथील रोहिदास वाडा परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबात बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मोठा भाऊ सलीम शमीम खान याला धाकटा भाऊ नईम शमीम खानने खिशातून पाचशे रुपये मिळत नसल्याने मोठ्या भावावर संशय घेत पाचशे रुपये मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठा भाऊ सलीमने स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने नईमवर हल्ला केला, ज्यामध्ये नईमचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी सलीम घरातून फरार झाला होता. मात्र, कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भावाभावातील हा वाद इतक्या गंभीर वळणावर जाईल, यावर स्थानिकांना विश्वास बसत नाही. या प्रकरणाचा कल्याण बाजारपेठ पोलीस अधिक तपास पोलिस करत असून, सलीमला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने 13 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.