संग्रहित छायाचित्र
पुणे: नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने कारवाई केली आहे. मुंजाबा वस्ती, मैत्री पार्क, धानोरी येथे पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलीस हवालदार विनोद महाजन व पोलीस हवालदार नागेश सिंग कुवर यांना माहिती मिळाली की, एका महिला नायलॉन मांजाची विक्री करत आहे. संबंधित ठिकाणी जाऊन पोलिसांनी सदर महिलेच्या जवळून 1600 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.
त्यानंतर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 223 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 05 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई युनिट-4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि व पोलीस अंमलदार यांनी केली.