बल्कर व कार अपघातात पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत सिमेंट बल्कर व कार यांचा भिषण अपघात झाला आहे. समोरासमोर झालेल्या या धडकेत कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारचालक पती गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 6 Jul 2024
  • 01:39 pm
crime news,  terrible accident,  cement bulker and a car, Wakhari village, e Pune-Solapur national highway accident

बल्कर व कार अपघातात पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत सिमेंट बल्कर व कार यांचा भिषण अपघात झाला आहे. समोरासमोर झालेल्या या धडकेत कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे  तर कारचालक पती गंभीर जखमी झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना शुक्रवार (५ जुलै) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाखारी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे घडली आहे. यामध्ये सारिका शिलवंत गायकवाड (वय ४० रा. हातोसी, ता. निलंगा, जि. लातुर) या मृत्युमुखी पडल्या आहेत तर त्यांचे पती शिलवंत शांतकुमार गायकवाड हे गंभीर जखमी झाल आहेत. 

गायकवाड पती -पत्नी हे आपली वॅगनार कार  क्रमांक एमएच १२ क्यूजी ५७२६ यामधून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी निघाले होते. ते वाखारी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे आले असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या अवजड बल्कर ट्रक क्रमांक एमएच १२ व्ही. एफ २४०१ ने कारला धडक दिली. समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमध्ये वॅगनार कार मोठ्या प्रमाणात चेपली गेली. स्थानिक नागरीकांनी गायकवाड दांपत्याला बाहेर काढले. उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू मोठ्या प्रमाणात जखमा व रक्तस्राव झालेने सारिका या उपचारापुर्वीच मयत झाल्या तर त्यांचे पती शिलवंत गायकवाड हे गंभीर जखमी झालेनें त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस नाईक व्ही. डी. कापरे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मटाले करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest