Crime News : पत्नी व्हॉटस्ॲपवर चॅटींग करत असते म्हणून पतीकडून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

पत्नी ही व्हॉटस्ॲप वर चॅटिंग करत असते याच्या रागातून पतिने पत्नीचा गळा वळून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार रविवार ते बुधवार या कालावधीत औंध मिलिटरी कॅम्प, रक्षक चौक परिसरात घडला आहे.

Crime News : पत्नी व्हॉटस्ॲपवर चॅटींग करत असते म्हणून पतीकडून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र

पत्नी ही व्हॉटस्ॲप वर चॅटिंग करत असते याच्या रागातून पतिने पत्नीचा गळा वळून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार रविवार ते बुधवार या कालावधीत औंध मिलिटरी कॅम्प, रक्षक चौक परिसरात घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (१४ डिसेंबर) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित महिलेचे पती व सासरे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही व्हॉटस्ॲप चॅट वर बोलते याचा राग मनात धरून पती हा वेळोवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीला मारहाण करत होता. बुधवारी त्याने याच रागातून फिर्यादीच्या गळ्यात दोरीचा फास लावून दोरी घरातील सिलिंग फॅनला बांधून फिर्यादी ला खुर्चीवर उभे करून खालील खुर्ची ढकलून दिली. यावेळी फिर्यादी चे सासरे घरात असताना देखील त्यांनी  तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःचा जीव वाचल्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत पती व सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली असून सांगवी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest