पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव आलीशान कार चालकाने दुचाकीस्वाराचा घेतला बळी (Video)

पुण्यातील कल्याणी नगरमधील पॉर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा कोरेगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराला धडक देत चिरडले.

Hit and run in Pune

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव आलीशान कार चालकाने दुचाकीस्वाराचा घेतला बळी (Video)

पुण्यातील कल्याणी नगरमधील पॉर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा कोरेगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराला धडक देत चिरडले. या अपघातामध्ये 21 वर्षांच्या एका डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात घडला तेव्हा कारचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. (Hit and run in Pune)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

रौफ अकबर शेख (वय, 21) असे अपघातात मृत्यू झालेल्या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल कारचाकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे. आयुष प्रदीप तयाल (वय 34 वर्षे रा.हडपसर)  असे कारचालकाचे नाव आहे. अपघातानंतर हा कार चालक फरार झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष हा काल 1 ते 1.30 च्या दरम्यान एबीसी रोडवरून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता त्यावेळी त्याच्या भरधाव कारने ऍक्टिवा वरील तिघांना धडक दिली. त्यामध्ये या दुचाकीवरील तिघे किरकोळ जखमी झाले. मात्र तरी सुद्धा आरोपी आयुश याने आपली कार थांबवली नाही, तो तसाच वेगाने पुढे गेला आणि बाईकवरू जाणऱ्या रौफ याला जोरदार धडक दिली. तो गंभीर जखमी होऊ खाली कोसळला. पण त्याला मदत करायची सोडून कारचालक त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पळू गेला.

या अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या नाकरिकांनी तातडीने जखमी बाईकस्वाराला नोबल रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest