पुण्यात मावसभावाकडून मुलीवर बलात्कार; रुमालाने तोंड बांधून केले अत्याचार

घरामध्ये एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावसभावाने चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. आरोपीने या मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर अत्याचार केले.

Pune Rape News

पुण्यात मावसभावाकडून मुलीवर बलात्कार; रुमालाने तोंड बांधून केले अत्याचार

पुणे : घरामध्ये एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावसभावाने चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. आरोपीने या मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना सप्टेंबर २०२४ मध्ये घडला होता. पिडीत मुलीने याविषयी आईला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा आहे. पिडीत मुलीला घरी ठेवून फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी मावस भावाने ही मुलगी घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेतला. या मुलीचे जबरदस्तीने कपडे काढले. तिच्या तोंडाला रुमाल बांधून चाकूने मारून टाकण्याची धमकी दिली. तिला घाबरवून बलात्कार केला. त्यानंतर, कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत मुलीने कोणाकडेही वाच्यता केली नव्हती. मात्र, याबाबत तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest