PUNE CRIME NEWS: प्रसिद्ध सराफी व्यावसायिक फतेहसिंह रांका यांची फसवणूक

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिक फतेहसिंह रांका यांचे छायाचित्र आणि नाव ट्रू कॉलरवर वापरून त्याचा गैरवापर करून अनेक व्यावसायिक आणि मित्रांना फोन करून पैशांची मागणी करून ठगवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

ट्रू कॉलरवर लावले छायाचित्र आणि रांका यांचे नाव; सायबर चोरट्याने अनेकांकडे केली पैशांची मागणी

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिक फतेहसिंह रांका (Fatehsingh Ranka) यांचे छायाचित्र आणि नाव ट्रू कॉलरवर वापरून त्याचा गैरवापर करून अनेक व्यावसायिक आणि मित्रांना फोन करून पैशांची मागणी करून ठगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये (Vishrambag Police Station)  भादवि ४१९, आयटी ॲक्ट ६६ (सी) आणि ६६ (डी) अन्वये अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार १४ मार्च २०२४ पासून २६ मार्च रोजी पर्यंत घडला. याप्रकरणी फतेहसिंह नागराज रांका (वय ७०, रा. रेसिडेन्सी क्लब, डॉ. गुगले रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने स्वतःच्या मोबाईल नंबरच्या ट्रू कॉलरवर फिर्यादी फतेहसिंह रांका यांचे नाव आणि फोटो लावला. अनेक व्यावसायिक मित्रांना फोन केला. फोन वरून आपण फतेहसिंह यांचा  यांचा मुलगा शैलेश रांका बोलत असल्याचे खोटे सांगितले.

तोतयेगिरी करून अनेकांना व्यवसायिक कारणास्तव पैशांची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फिर्यादी यांना काही मित्रांनी फोन करून सांगितला. रांका हे रांका ज्वेलर्स ( Ranka Jewellers) प्रायव्हेट लिमिटेडच्या लक्ष्मी रस्त्यावरील कार्यालयात बसलेले असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) घोडके करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest