संग्रहित छायाचित्र
आयपीओ आणि ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७६ लाख ११ हजार ७०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.
याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राधाकृष्णन नायर, ऐश्वर्य शास्त्री जिओजित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना व्हाट्स अप वर मेसेज कृंत यांना एका ग्रुप मध्ये जॉईन होण्यास भाग पाडले.