Pune Crime News : खळबळजनक! आळंदीत महाराजाने केले 2 अल्पवयीन मुलांशी अनैसर्गिक कृत्य, खासगी शिक्षण संस्थेतील धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 02:28 pm

प्रातिनिधिक छायाचित्र....

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचे समोर आले आहे.

आळंदी पोलिसांनी आरोपीवर पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महेश नामदेव मिसाळ (टोपण नाव मामा) (वय २८ वर्षें रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली तर साथीदार महिला आरोपीवरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आळंदी येथे वारकरी शिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. यात अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. यात आरोपी देखरेखीच काम पाहत होता. शनिवारी ( दि.४) रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही मुले झोपली असताना त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले.

याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस झाला असून, मुलांच्या आईने फिर्याद दिल्यावर महराजाला गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Share this story

Latest