Crime News : शेअर मार्केटच्या नावाने ६७ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची ६७ लाख ८६ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Mon, 6 Jan 2025
  • 07:16 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची ६७ लाख ८६ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सारा स्मित, चंद्रतकल, देवा सिक्युरिटीज यांसह १३ बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केट संबंधित माहिती दिली. शेअर मार्केट आणि आयपीओ मध्ये पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ६७ लाख ८६ हजार ३७१ रुपये घेत त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest