पुण्यात गोळीबाराचं सत्र सुरूच; येरवड्यात एकावर सराईतांकडून गोळीबार

येरवडा: हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्यामुळे सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास येरवडा येथे घडली. या घटनेत विकी राजू चंडालिया (वय 30, रा. जय जवान नगर येरवडा) जखमी झाला असून सात आरोपीविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संग्रहित छायाचित्र

येरवडा:  हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्यामुळे सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास येरवडा येथे घडली. या घटनेत विकी राजू चंडालिया (वय 30, रा. जय जवान नगर येरवडा)  जखमी झाला असून सात आरोपीविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, आम्हाला सतीश चंडालिया, अभिषेक शाम चंडालिया (सर्वजण रा. रेंजहिल्स,पुणे), सुशांत प्रकाश कांबळे(रा. पर्णकुटी सोसायटी येरवडा),संदेश संतोष जाधव, संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा) या सात आरोपीविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  गोळीबाराच्या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेतील आरोपींवर पुणे शहर व ग्रामीण पोलीस हद्दीत गुन्हे दाखल आहेत. (Pune Firing Case)

पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अग्रसेन हायस्कूल समोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये काही सराईत गुन्हेगार घुसले होते. हॉटेल चालक विकी चंडालिया याला त्यांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आकाश चंडालिया यांनी त्याच्या जवळील पिस्तूल काढून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वरती लागली. तसेच त्याने व त्याच्या साथीदारांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. गोळीबार करून सर्व आरोपी फरार झाले. घटनास्थळी तात्काळ येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी धाव घेतली. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी काही संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.  (Yerwada Firing Case)

घटनास्थळी पोलिसांनी दोन पुंगळ्या हस्तगत केल्या आहेत. अग्रसेन हायस्कूल समोरील या हॉटेल संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. याच परिसरात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून लुटमार तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी देखील झालेले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या अधिकृत हॉटेल, पान टपरी व इतर अवैध व्यवसायामुळे शहरात सातत्याने विविध गुन्ह्यांसह गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यावर पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. गोळीबार झालेल्या सदर अनधिकृत हॉटेलवर पोलीस तसेच महापालिका प्रशासन यांनी कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest