पुण्यात खळबळ... पाच वर्षीय मुलीवर उचलून नेत बलात्कार; अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार थांबेनात
पुणे : एका पाच वर्षीय अल्पावयीन मुलीला उचलून नेत तिच्यावर एका नराधम तरुणाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरात बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Rape News)
प्रज्वल (वय १८) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पिडीत मुलीच्या ३३ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा पिडीत मुलीच्या घराशेजारी राहण्यास आहे. पिडीत मुलगी बुधवारी संध्याकाळी घरासमोरील अंगणात खेळ होती. आरोपीने तिला जबरदस्तीने उचलून घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात नेले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे करीत तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले. पिडीत मुलीने याविषयी तिच्या आईला याविषयी माहिती दिल्यानंतर पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला.