Pimpri Chinchwad : गर्भपातास नकार, प्रियकराची जिवे मारण्याची धमकी

लग्‍नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. यातून ती तरुणी दुसऱ्यांदा गरोदर राहिली असता तिने गर्भपात करण्‍यास नकार दिला. यामुळे तिच्‍या प्रियकराने तिला आणि तिच्‍या लहान मुलाला जिवे मारण्‍याची धमकी दिली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

लग्‍नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. यातून ती तरुणी दुसऱ्यांदा गरोदर राहिली असता तिने गर्भपात करण्‍यास नकार दिला. यामुळे तिच्‍या प्रियकराने तिला आणि तिच्‍या लहान मुलाला जिवे मारण्‍याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी आणि चिखली येथे घडली.

धनाजी ज्ञानदेव काळे (वय ३७, रा. मु. भांब, पो. ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणीने रविवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ जून २०२२ ते ९ सप्‍टेंबर २०२४ या कालावधीत काळेवाडी आणि चिखली परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी धनाजी काळे याने पीडित तरुणीला लग्‍नाचे आमिष दाखवून तिच्‍यावर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. यातून फिर्यादी या पहिल्‍यांदा गरोदर राहिल्‍या असता आरोपीने त्यांना जबरदस्‍तीने गर्भपात करण्‍यास भाग पाडले. त्‍यानंतर पुन्‍हा गरोदर राहिल्‍या असता आरोपीने पुन्‍हा गर्भपात करण्‍यासाठी जबरदस्‍ती केली. मात्र फिर्यादी यांनी गर्भपातास नकार दिल्‍याने आरोपीने त्‍यांना शिवीगाळ करीत फिर्यादी आणि त्‍यांच्‍या लहान मुलास जिवे मारण्‍याची धमकी दिली.

Share this story

Latest