Crime News : बालविवाह प्रकरणी आईसह मौलाना विरोधात गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन दिल्या प्रकरणी मुलीची आई, लग्न लाऊन देणारा मौलाना, पती आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी राजीव गांधीनगर देहूरोड येथे घडला.

Crime News : बालविवाह प्रकरणी आईसह मौलाना विरोधात गुन्हा

संग्रहित छायाचित्र

अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन दिल्या प्रकरणी मुलीची आई, लग्न लाऊन देणारा मौलाना, पती आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी राजीव गांधीनगर देहूरोड येथे घडला.

सालेम उस्मान इनामदार (वय २५), त्याची आई आणि वडील (तिघे रा. मंगळवार पेठ, जुन्नर), मुलीची आई (वय ४०, रा. देहूरोड) आणि मौलाना मुख्तार गफ्फार शेख (वय ४६, रा. देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने तिचा विवाह सालेम इनामदार या तरुणासोबत लाऊन दिला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील मौलाना याने लग्न लाऊन दिले, याबाबत त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest