Pune Crime News : बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल; वैद्यकीय पदवी नसताना नाडी परीक्षण करुन रुग्णांना देत होता औषधे

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय तपासणी करुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नवी पेठेतील नाडी परीक्षण करुन नागरिकांना औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bogus doctor

संग्रहित छायाचित्र

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय तपासणी करुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नवी पेठेतील नाडी परीक्षण करुन नागरिकांना औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग बबनराव देवडकर (वय ४०, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. गोपाळ उजवनकर (वय ३८) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोप देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी नसताना नाडी परीक्षण करुन तो नागरिकांना औषध देत होता. अशी तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच आरोपी देवडकर याची चौकशी केली असता, त्याच्याकडे वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (१) उल्लंघन केल्याप्रकरणी देवडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव आणि वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेहमूद फारुक शेख याला अटक करण्यात आली होती. शेख हा महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले. दहावीनंतर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता.

यापूर्वीही डाॅक्टर असल्याच्या नावाखालीह बोगसगिरी चालवणाऱ्यांचे प्रकार उघड झाले होते. मुंढवा केशवनगर भागातील पी. रामकृष्ण रेड्डी (वय ६६) शस्त्रक्रिया विभागात मदतनीस होता. निवृत्तीनंतर त्याने उत्तर प्रदेश येथून एका संघटनेकडून प्रमाणपत्र घेऊन मुंढवा भागात दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते. जुलै महिन्यात लोणी काळभोर भागात तोरणे नावाच्या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली होती. वारजे भागात मूळव्याधीवर उपचार केंद्र चालविणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली होती.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest