पिंपरी-चिंचवड : टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला. तसेच कारचीही तोडफोड केली. ही घटना माउलीनगर, दिघी येथे बुधवारी (दि. ४) रात्री घडली.

Pimpri Chinchwad Crime

पिंपरी-चिंचवड : टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला. तसेच कारचीही तोडफोड केली. ही घटना माउलीनगर, दिघी येथे बुधवारी (दि. ४) रात्री घडली. सुमित ज्ञानेश्वर शिंदे (वय २७, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी वस्ताद महेश उपाडे, त्याचा भाऊ, यश मोहिते, दाद्या मोहिते व त्यांचे पाच ते सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित व आरोपींमध्ये किरकोळ वाद होता. याचा राग मनात ठेवून आरोपी यश मोहिते हा फिर्यादींचा मित्र नीलेश शिंदे यास फोन करून शिवीगाळ करीत होता. सुमित हा त्याला समजावण्यासाठी गेला असता महेश उपाडे याच्या भावाने फिर्यादीवर कोयत्याने डोक्यात मारले. सावध असलेल्या सुमितने हात मध्ये घातल्याने तो वार हातावर झेलला. यश मोहिते याने कोयत्याने फिर्यादी यांच्या पोटावर कोयत्याने वार केला. आरोपी महेश उपाडे याने बॅटने डोक्यात मारहाण केली. इतरांनी फिर्यादींचे मित्र महेश शिंदे, सूरज घेनंद, आकाश घेनंद यांना लाथाबुक्क्यांनी तसेच बॅटने मारहाण केली. फिर्यादींच्या कारवर दगड मारून नुकसान केले. तसेच जमलेल्या नागरिकांनाही धमकावले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest