संग्रहित छायाचित्र
पुणे : मध्यरात्री शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला टोळक्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करत असल्याने तरुणाने पळ काढला परंतु त्याचा पाठलाग करुन घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांची नासधुस केली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे घडला.
याप्रकरणी करण भानुदास आगलावे (वय २०, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अफ्रिदी शेख, सुफियान शेख, शहादाब शेख, अबु शेख या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शेंडगे, गणेश खानविलकर हे लोहियानगर येथे शेकोटी करुन बसले होते. फिर्यादी करण आगलावे ही मध्यरात्री साडेबारा वाजता शेकोटीच्या इथे येऊन गप्पा मारु लागले. त्यावेळी आफ्रिदी ऊर्फ बुढ्ढा शेख हा त्यांच्याकडे आला. शिवीगाळ करुन तो मारहाण करुन लागला. तेव्हा करण व इतर सर्व गल्लीमध्ये घुसले. त्यांच्या मागोमाग टोळके आले. त्यांनी लाकडी दांडे घेऊन फिर्यादी यांना मारहाण करु लागले. तेव्हा ते राहुल शेंडगे याच्या घराजवळ लपून बसले. त्यावेळी सर्व जण शेंडगे यांच्या घरासमोर येऊन राहुल कोठे आहे, अशी विचारणा करीत घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांची नासधुस केली. त्यानंतर ते शिवीगाळ करत तेथून निघून गेले. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करीत आहेत.