Pune Crime : क्लासमधील विद्यार्थीनीवर शिक्षकाचा बलात्कार, चाईल्ड हेल्पलाईवर तक्रार दिल्याने प्रकार उघडकीस

क्लास मधील शिक्षकानेच विद्यार्थीनीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या मुलीने चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क केल्याने या शिक्षकाचे कृत्य समोर आले. (Pune Crime News)

Pune Crime

क्लासमधील विद्यार्थीनीवर शिक्षकाचा बलात्कार

लोणी काळभोर :  क्लास मधील शिक्षकानेच विद्यार्थीनीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या मुलीने चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क केल्याने या शिक्षकाचे कृत्य समोर आले. (Pune Crime News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून  सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील ही मुलगी हंडेवाडी (ता. हवेली) परीसरांत आपल्या मैत्रिणीसह राहण्यास आहे.  समृध्दी हॉटेल समोर असलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफीसमध्ये  क्लाससाठी जुलै २०२३ पासून आली आहे. हे क्लासेस सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू असतात.

शेरमाळेने नोव्हेंबर महीन्यात दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारांस तिला घरी कपडे धुण्यासाठी बोलाविले होते. कपडे धुत असतांना त्याने जबरदस्तीने पाठीमागून येवून तिला पकडले व जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.  घाबरून गेली असल्याने तिने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर शेरमाळे याने पुन्हा घरी बोलावून परत दोन वेळा बलातकार  त्यानंतर ७ डिसेंबर २०२३ रोजी चुलते वारल्यानंतर ही मुलगी मुळ गांवी गेली. 

१३ डिसेंबर रोजी पिडीत मुलगी मुळ गांवावरून परत आल्यानंतर सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने सदर घडलेला प्रकार  चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १८१ वर संपर्क साधला.  घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. त्यानंतर सखी वन स्टॉप सेंटर १ मुंढवा येथे जावून घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तेथील कर्मचारी यांचेसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी त्यानुसार  सुदर्शन शेरमाळे याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest