संग्रहित छायाचित्र
महिलेच्या परस्पर बँक खात्यातून 5 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार मंगळवारी (दि.28) रहाटणी येथे घडला आहे.
याप्रकऱणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून SHUKAR MIRDHA या नावाच्या खाते क्रमांकावर व पुढे ट्रान्सफर केलेल्या बँक खाते धऱकावर हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी यांच्या बँक खात्यातून आरोपीने परस्पर खाते हॅक करत खात्यातून 5 लाख रुपये काढून घेतले. याबाबत माहिती मिळताच महिलेने वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.