Molestation : पहिल्यांदा घडलेल्या घटनेला वाचा न फोडणे पडले आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीला महागात

शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचा लैकीक आहे. हा लैकीक हडपर येथील घडलेल्या घटनेमुळे धुळीस मिळाला आहे. एका १४ वर्षाच्या मुलीला दोन दिवसाच्या अंतराने विनयभंगाला (molestation) सामोरे जाण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Molestation

पहिल्यांदा घडलेल्या घटनेला वाचा न फोडणे पडले आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीला महागात

पुणे: शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचा लौकीक आहे. हा लौकीक हडपसर येथील घडलेल्या घटनेमुळे धुळीस मिळाला आहे. एका १४ वर्षाच्या मुलीला दोन दिवसाच्या अंतराने विनयभंगाला (molestation) सामोरे जाण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी (Hadpsar police) बेड्या ठोकल्या आहेत. 

 हडपसर भागातील साडेसतरा नळी येखील काळुबाई मंदिरासमोरील रिक्षा स्टॉपवर दोन आरोपींनी १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी भर रस्त्यावर विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर हरगुडे (३७), भुषण कठारे (२८) दोघे रा. हडपसर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हरगुडे हा स्वत:चा व्यवसाय करतो. तर कठारे एका खासगी ठिकाणी नोकरीस आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीच्या समोरील एका घरात आरोपी राहतात. फिर्यादी मुलगी तिच्या मामे बहिणीला डबा देवून रिक्षाने स्टॉपवर आली होती. त्यावेळी आरोपींनी तिला आवाज दिला. त्यावेलई मुलीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोपींनी तिचा रस्ता अडवला. तर एका आरोपीने तिचा हात पकडला. तर दुसऱ्या आरोपीने तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. या प्रकाराने फिर्यादी मुलगी घाबरली होती. तिने ओरडण्यास सुरुवात केली असता, तिचे तोंड दाबण्यात आले. तसेच तिला शिवीगाळ करुन तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली. भेरदलेल्या मनस्थितीतून तिने कशी बशी स्वत:ची सुटका करुन घेतली. 

 घरी पोहचताच तिने तिच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आई वडिलांसह हपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोन वर्षांपासून होतोय तिचा लैंगिक छळ...

तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीसोबत या पूर्वी देखील या आरोपींनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपींनी दिलेली धमकी आणि घराच्या भितीमुळे तिने शांत बसणे पसंत केले. त्यानंतर असा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून घडत आहे, असे फिर्यादीकडे चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितले.  १६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजत आणि १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दोन दिवसात दोन वेळा वियभंग झाल्याने फिर्यादीमुलीने धाडक करुन हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची तात्काळ दखल घेत हडपसर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest