वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार; आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री सामंत यांचे आश्वासन

पुणे : वडगाव शेरी,  धानोरी, लोहगाव, येरवडा या भागातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात येईल. त्यात निकषात बसणाऱ्या पूरग्रस्ताना मदत देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले जातील.

Sunil Tingare, Pune Flood, Uday Samant

संग्रहित छायाचित्र

पूरपरिस्थितीवर विधानसभेत चर्चा; पुरस्थिती टाळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार

पुणे : वडगाव शेरी,  धानोरी, लोहगाव, येरवडा या भागातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात येईल. त्यात निकषात बसणाऱ्या पूरग्रस्ताना मदत देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले जातील. तसेच नेहमीची पुरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सुचना केल्या जातील असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले.

वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी जुन महिन्यात पुणे शहरासह वडगाव शेरी मतदार संघातील विविध भागात पावसामुळे आलेल्या पुरावर लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना आमदार सुनील टिंगरे म्हणाले, गेल्या पाच- सहा वर्षात पुणे शहरात सातत्याने पूरपरिस्थिती उद्भवत आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव शेरी मतदार संघातील धानोरीमधील लक्ष्मीनगर, विघ्नहर्ता, साईपार्क, कळसमधील गंगा कुंज, येरवड्यातील लक्ष्मीनगर, यशवंतनगर, वडगाव शेरीतील इनऑर्बिटमॉल, गार्डिनीय, शुभम, आनंदपार्क सोसायटी, सैनिकवाडी नागपुरचाळमध्ये रक्षकनगर, लोहगावमध्ये दादाची वस्ती, विमाननगरमध्ये लुकंड एमेझॉन आणि तुळजाभवानी नगर या भागात सातत्याने पाऊस झाला की पुर येतो. त्यामुळे रहिवाशांच्या घरात पाणी जाते आणि गोरगरीबांच्या घरातील साहित्य, फर्निचर, शालेय साहित्य यांचे नुकसान होते. दरवर्षी पालिका नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तरी पावसाळ्यात लाईनमध्ये कचरा, साहित्य सापडणे असे प्रकार घडतात. त्याचा फटका गोरगरीब नागरिकांना बसतो. त्यामुळे पुरामुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे,  त्यांचे सर्व्हेक्षण करुन सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात यावी आणि सातत्याने होणारी पुरस्थिती रोखण्यासाठी कालबद्ध उपाय योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली.

त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, वडगाव शेरी मतदारसंघातील पुरामुळे नुकसान झालेल्या सोसायट्या तसेच घराचे सर्व्हेक्षण करुन जे निकषात बसतील त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच पुरपरिस्थिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना राबविण्यासाठी महापालिका आयुक्ताना आमदार टिंगरे यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन उपाय योजना करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले.

बिल्डरांसाठी नाले वळविले - आमदार टिंगरेचा आरोप
मतदार संघात अनेक ठिकाणी नाले बुजविल्याने आणि वळविले गेले आहेत. महापालिकेने अनेक बिल्डरांसाठी नाले वळविल्याने ही पुरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप आमदार टिंगरे यांनी केला. गेल्या पाच वर्षात किती नाले बुजविले किती नाले वळविण्यात आली यांची माहिती देण्यात यावी अशी मागणीही आमदार टिंगरे यांनी विधानसभेत केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest