'महाराष्ट्र आयर्नमेन'च्या 'जर्सी'चे अनावरण

प्रीमिअर हँडबॉल लीग या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 'महाराष्ट्र आयर्नमेन' या संघाच्या जर्सीचे अनावरण नुकतेच पुण्यात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. या वेळी संघाचे मालक पुनित बालन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सुनील कुमार आणि साहाय्यक प्रशिक्षक अजय कुमार उपस्थित होते. ८ जूनपासून प्रीमिअर हँडबॉल लीगला सुरुवात होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 2 Jun 2023
  • 09:32 am
'महाराष्ट्र आयर्नमेन'च्या 'जर्सी'चे अनावरण

'महाराष्ट्र आयर्नमेन'च्या 'जर्सी'चे अनावरण

प्रीमिअर हँडबॉल लीग या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 'महाराष्ट्र आयर्नमेन' या संघाच्या जर्सीचे अनावरण नुकतेच पुण्यात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. या वेळी संघाचे मालक पुनित बालन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सुनील कुमार आणि साहाय्यक प्रशिक्षक अजय कुमार उपस्थित होते. ८ जूनपासून प्रीमिअर हँडबॉल लीगला सुरुवात होत आहे.    

या वेळी पुनित बालन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले की, 'हँडबॉलचा सहभाग ऑलिम्पिकमध्ये असतो, हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे आगामी काळात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन हँडबॉल प्रकारात देशासाठी पदके जिंकू शकतील, असे खेळाडू निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही त्यांना सर्व त्या सोयी-सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहोत.'

आंतरराष्ट्रीय क्रिकेटर केदार जाधव म्हणाले की, 'मी शाळेत असताना हँडबॉल खेळलो आहे आणि मला तो खेळ खूप जवळचा वाटतो. पुनित बालन यांचे स्वप्न आणि त्यासाठी 'महाराष्ट्र आयर्नमेन' घेत असलेले परिश्रम यामुळे आपला देश नक्कीच ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करेल, असा मला विश्वास वाटतो.'

प्रीमिअर हँडबॉल लीग ८ ते २५ जून दरम्यान राजस्थानमधील जयपूर येथे असलेल्या सवाई मानसिंग इंदूर स्टेडियम येथे होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम १८ नेटवर्क-स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स खेल आणि जिओ सिनेमावर होणार आहे.

संघाचे प्रमुख  प्रशिक्षक सुनील कुमार यांनी सागितले की, 'स्पर्धेच्या दृष्टीने आम्ही अत्यंत कसून तयारी करत आहोत. हँडबॉल लीग स्पर्धेचा कालावधी बऱ्याच दिवसांचा असल्याने आम्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करून विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करूच.'

Share this story

Latest