संग्रहित
पर्वती टेकडीजवळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव दामिनी मार्शल आणि पुणे पोलिसांच्या तत्परतेने जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12.40 च्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात एक महिला आत्महत्या करण्यात प्रयत्न करत असल्याची माहीती दामिनी मार्शल यांना समजली. त्यावेळी दामिनी मार्शल यांनी थेट पुणे शहर च्या वपोनी श्रीमती संगीता जाधव व म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल यांच्याशी थेट संपर्क साधला.
मार्शल यांच्या माहितीनंतर पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेतला. त्यावेळी तिचे लोकेशन चेंज झाले होते पर्वती टेकडी असं लोकेशन दाखवण्यात आले. त्यानंतर तात्काळ पर्वती पोलीस दामिनी मार्शल यांनी तिचा शोध घेतला आणि महिलेला ताब्यात घेतलं.
त्यानंतर त्या महिलेला शिवाजीनगर येथे पोलिस ठाण्यात नेले. तिथे त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, नवऱ्यासोबत काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाले होते. सदर महिलेचे व तिच्या नवऱ्याचे समुपदेशन केले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांना वरिष्ठांच्या समक्ष नेऊन,सदर महिला यांचे मामा-मामी,पती आणि इतर नातेवाईक यांच्या ताब्यात सुखरूप दिले.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन. पुणे श्री सावंत व भरोसा सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव , म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल भरोसा सेल गुन्हे शाखा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दामिनी मार्शल वरील स्टाफ व पोलीस स्टेशन मार्शल वरील स्टाफ यांनी केली आहे.