संग्रहित छायाचित्र
पुणे : दिवाळीच्या सुट्यांमध्ये परिवारासह सहलीचे नियोजन केले जाते. हीच आपली सहल आणखी आनंदी आणि सुखावह करण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने पर्यटन बससेवा दरवर्षीप्रमाणे सुरु केली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा असणार आहे. पर्यटन बससेवेसाठी स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बसची असणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी या बससेवेचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटक, भाविक-भक्त तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद व पसंती मिळत आहे. पीएमपीएमएल ची पर्यटन बससेवा किफायतशीर दरात उपलब्ध असल्याने दिवाळीच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेसोबत लुटावा असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होणेच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी व इतर दिवशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .
पर्यटन बससेवेचे मार्ग व इतर माहिती खालीलप्रमाणे
पर्यटन बससेवा क्र. १
मार्ग - हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १६:००
बसचा पहिला व शेवटचा थांबा - हडपसर गाडीतळ
प्रति प्रवासी तिकीट दर – ५०० रूपये
पर्यटन बससेवा क्र. २
मार्ग - हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर
मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १८:३०
बसचा पहिला व शेवटचा थांबा - हडपसर गाडीतळ
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ३
मार्ग - डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १७:००
बसचा पहिला व शेवटचा थांबा – डेक्कन जिमखाना
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ४
मार्ग - पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १६:४५
बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ५
मार्ग - पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १७:३०
बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ६
मार्ग - पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक),
रांजणगांव गणपती, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १७:३०
बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ७
मार्ग - भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी
(शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ - १८:२०
बसचा पहिला व शेवटचा थांबा – निगडी भक्ती शक्ती बसस्थानक
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. ८
मार्ग – पुणे स्टेशन-डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव,
स्वामी नारायण मंदिर नऱ्हे – आंबेगाव, पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ – १९:००
बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन.
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पीएमपीएमएलची अशी आहे पर्यटन बससेवा ..
१. बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत
देण्यात येईल.
२. परिवहन महामंडळाकडून सर्व पर्यटन बससेवेचे दर प्रतिव्यक्ती प्रतिमार्गाकरीता ५०० रुपये निश्चित करण्यात आलेला आहे.
तसेच पर्यटन बससेवेकरीता बुकिंग - १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवरून करण्यात येते.
३. या बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्या पुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची मुभा राहील.
४. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
५. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
६. सदरील पर्यटन बससेवेचे तिकिट बुकिंग व स्थळांसंदर्भातील माहिती करीता पीएमपीएमएल चे समन्वयक सेवक नितीन गुरव ९८५०५०१८६२ यांच्याशी संपर्क साधावा. तरी दिवाळीच्या सुट्यांमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पर्यटन बससेवेचा लाभ निसर्गप्रेमी, पर्यटक व भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.