सहा महिन्यांत पीएमपीएमएलच्या साडेअकरा हजार बस फेल; ऐन दिवाळीत ब्रेकडाऊनचे ग्रहण

सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा बजावणारी पीएमपी सेवेला ब्रेकडाऊनचे ग्रहण लागली आहे. विविध कारणांनी रस्त्यावरती पीएमपी बस बंद पडत असल्याच्या घटना घडतात. गेल्या सहा महिन्यांत पीएमपीएमएलच्या ११ हजार ७५७ बस रस्त्यावर बंद पडल्याची (ब्रेकडाउन) नोंद आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 31 Oct 2024
  • 04:23 pm
PMPML,Failed,Six months,breakdown,Diwali,PMP buses

रस्त्यावरती पीएमपी बस बंद पडत असल्याच्या घटना घडतात

ठेकेदारांच्या बससंदर्भातील तक्रारींची संख्या तुलनेने अधिक

सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा बजावणारी पीएमपी सेवेला ब्रेकडाऊनचे ग्रहण लागली आहे. विविध कारणांनी रस्त्यावरती पीएमपी बस बंद पडत असल्याच्या घटना घडतात. गेल्या सहा महिन्यांत पीएमपीएमएलच्या ११ हजार ७५७ बस रस्त्यावर बंद पडल्याची (ब्रेकडाउन) नोंद आहे. यात सर्वाधिक म्हणजे २,७१३ बसेस एकट्या ऑगस्ट महिन्यात रस्त्यावर बंद पडल्या. बंद पडणाऱ्या बसमध्ये ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

या आठवड्यात दिवाळी असल्याने विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशाची संख्या वाढते. त्यातच पाडवा आणि भाऊबीज या दिवशी पीएमपी बस वाढवण्यात येतात. मात्र, महामंडळातील अनेक आगारातील बस या किलोमीटरच्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. परिणामी, या बस रस्त्यातच बंद पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीचे एकूण ३८१ मार्ग आहेत. या मार्गावर साधारण १,६०० च्या आसपास बस दररोज धावतात. यापैकी साधारण साडेआठशे बस ठेकेदारांच्या, तर साडेसातशे बस पीएमपीच्या आहेत. त्यात सर्वाधिक बस ठेकेदारांच्या बंद पडत असल्याचे पीएमपीचे अधिकारी सांगत आहेत.

ठेकेदाराने पीएमपीसोबत करार करताना ठरल्याप्रमाणे बस मार्गावर सोडणे बंधनकारक असते. ठेकेदारांकडून या बस मार्गावर सोडल्याही जातात. पण, ठेकेदारांच्या बसचे दररोज ब्रेकडाउन होते. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या घटते. त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत असून, त्यांना रस्त्यातच उतरवण्यात येते. त्यामुळे या दिवाळीच्या तोंडावरती शहरातील प्रवाशांना हा फटका बसू नये, यासाठी पीएमपी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे.

पीएमपी वाहतूक व्यवस्थापक सांगतात की, बसचे ब्रेकडाउन झाल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, दंड करूनही ठेकेदारांच्या बसचे ब्रेकडाउन घटताना दिसत नाही. ब्रेकडाउनच्या घटना पाहता पीएमपी प्रशासन ठेकेदारांवर खरच दंडात्मक कारवाई करते का? असा प्रश्न उपस्थित होतो.गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीच्या बसचे ब्रेकडाउन प्रचंड वाढले आहे. कोणती बस, कुठे अचानक बंद पडेल, याचा हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

आगारातील बस वाढणार कधी ?

पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध आगारात असलेल्या बसची संख्या घटत आहे. त्यापैकी अनेक बसची किलोमीटर ओलांडलेली आहे. त्यातच ठेकेदाराकडून पुरवण्यात आलेल्या बसेस या देखील विविध कारणांनी बंद पडत असल्याने प्रवाशांकडून तक्रारीत वाढ होत आहे. मात्र, पीएमपीएमएल  प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने या ठेकेदारांचे फावत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest