Pune Metro News : मेट्रो शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा शुक्रवारी (दि.१) सायंकाळी सहानंतर बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Thu, 31 Oct 2024
  • 06:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे मेट्रोची (Pune Metro) प्रवासी सेवा शुक्रवारी (दि.१) सायंकाळी सहानंतर बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.

मेट्रो दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे धावते. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाचा सण आहे. त्यामुळे त्या दिवशी मेट्रो सुविधा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहे. त्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्यात येणार आहेत. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.2) मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत सुरळीत सुरू राहणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Share this story

Latest