संग्रहित छायाचित्र
पुणे : मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिर(Shree Ekvira Devi Navratri Festival ) परिसरात १५ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत असल्याने यात्रा कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जड, अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rejesh Deshmukh) यांनी जारी केले आहेत. (Mumbai-Pune Highway Traffic )
मौजे वेहेरगांव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. २१ ते २३ ऑक्टोबर या ३ दिवसाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगांव बुद्रुक टोलनाका - वडगांव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा - कुसगांव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूकडे जातील.
२१ ते २३ ऑक्टोबर या ३ दिवसाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगांव तळेगांव फाटा - लोणावळा - मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबई बाजूकडे जातील.
अधिसूचना लागू केल्यानंतर काही विधीग्राह्य मुद्दा उपस्थित झाल्यास त्याअनुषंगाने सुधारित अधिसूचना काढण्यात येईल. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.