दहीहंडीनिमित्त पीएमपीच्या बस मार्गात 'असे' असतील बदल

अवघ्या तीन दिवसांवर दहिहंडी उत्सव येथून ठेपला आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाची मंडळांनी मोठी तयारी देखील सुरु केली आहे. दहिहंडी पाहण्यासाठी शहारतच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहुन सचंलनात असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 5 Sep 2023
  • 09:49 am
PMP bus

दहीहंडीनिमित्त पीएमपीच्या बस मार्गात 'असे' असतील बदल

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावरील पीएमपी मार्गांत तात्पुरत्या स्वरूपात बदल

अवघ्या तीन दिवसांवर दहिहंडी उत्सव येथून ठेपला आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाची मंडळांनी मोठी तयारी देखील सुरु केली आहे. दहिहंडी पाहण्यासाठी शहारतच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहुन सचंलनात असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. तसेच पीएमपीने केलेल्या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.   

 गुरूवारी (ता. ७) दहिहंडी निमित्त वाहतुक पोलीस यांच्या सुचनेनुसार पीएमपीच्या वाहतूकीत बदल...

  • बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. ११३ अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन  स्थानकावरून संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार)  या मार्गाने संचलनात राहतील.
  • मार्ग क्र. १७४ दिनांक ०६/०९/२०२३ व ०७/०९/२०२३ रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
  • बस मार्ग क्र. २ , २ अ, १०, ११, ११ अ, ११ क, १३, १३ अ, २८, ३०, २०, २१, ३७, ३८, ८८, २१६, २९७, २९८, ३५४, रातराणी-१, मेट्रो शटल-१२ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडुन स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र स्वारगेटकडुन शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बसेस मार्गाने बाजीराव रोडने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. ७, १९७, २०२ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. ६८ या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • स्वारगेट आगाराकडुन बस मार्ग क्र. ३ व ६ हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest