वाढदिवसादिवशीच आला होता काळ, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण

पुणे : कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथील एका कपड्याच्या दुकानाला आज आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समजतात अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथील एका कपड्याच्या दुकानाला आज आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समजतात अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर पाच महिला व एक तीन वर्षाच्या मुलाला अग्नीशमन दलाच्या जवानांनी वाचवले. 

कोंढव्यातील एका कापड्याच्या दुकानाला आग मंगळवारी दुपारी आडीच वाजता लागली. या घटनेची माहिती समजताच कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या कपड्याच्या दोन दुकानामधून आग लागल्याचे दिसून येताच पाण्याचा मारा सुरु करण्यात आला.  आगवरील मजल्यावर व इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घेत वरील मजल्यावर अडकलेल्या पाच महिला व एक तीन वर्षाच्या मुलाला श्वसन यंत्र (बी ए सेट) परिधान करीत आग व धुरामधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुमारे वीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. आगीमध्ये कपडे, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, यंत्रसामुग्री आदी जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये एका महिलेच्या पायाला व दलाचे जवान यांच्या हाताला भाजले. 

दरम्यान, या घटनेदरम्यान वाचवलेल्या तीन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याच्या जन्मदिन मोठी दुर्घटना घडली. या घटनेत तो अडकला होता. मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. त्यामुळे नागरिकांकडून जवानांचे कौतुक केले जात आहे. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते, हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest