गृह प्रकल्पातील सोडतीला मुहूर्त मिळेना

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील बाराशे घरांची सोडत पुढे ढकलण्यात येत आहे. प्रत्यक्षात जुलै महिन्यामध्ये ती सोडत निघणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून ती होऊ शकली नाही, तर दुसरीकडे तब्बल अडीच वर्षांनी होत असलेल्या या सोडतीमध्ये सदनिकांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच रिकाम्या राहिलेल्या या घराच्या किमती वाढल्याने नागरिकांची नाराजी वाढणार आहे.

पीएमआरडीएची सेक्टर २२ आणि सेक्टर ३०, ३२ मधील बाराशे घरे रिकामी, उरलेल्या घरांच्या किमती वाढण्याची शक्यता

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील बाराशे घरांची सोडत पुढे ढकलण्यात येत आहे. प्रत्यक्षात जुलै महिन्यामध्ये ती सोडत निघणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून ती होऊ शकली नाही, तर दुसरीकडे तब्बल अडीच वर्षांनी होत असलेल्या या सोडतीमध्ये सदनिकांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच रिकाम्या राहिलेल्या या घराच्या किमती वाढल्याने नागरिकांची नाराजी वाढणार आहे.

प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहयोजना आणि पेठ क्रमांक १२ येथील गृह प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक अडचण सांगून ही सोडत होऊ शकली नाही. दरम्यान म्हाडा प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहारदेखील केला होता. त्यामुळे या घरांची सोडत लवकर होईल, अशी अपेक्षा होती. घरांची सोडत लवकर व्हावी यासाठी काही नागरिकांनी देखील प्राधिकरणाकडे विचारणा केली होती.

वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० व ३२ येथे पीएमआरडीएच्या वतीने ७९८ घरांचा प्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी ३७८ वनरूम किचन सदनिका साकारल्या आहेत. तर, अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी ४१४ वन बीएचके सदनिका आहेत. येथील घरांसाठी यापूर्वी एकदा सोडत काढण्यात आली होती. दरम्यान, या गृह प्रकल्पातील बहुतांश घरे शिल्लक आहेत. त्यासाठी आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे. ही दुसरी सोडत दुसरी आहे. यातूनही काही घरे शिल्लक राहिल्यास त्याची तिसऱ्यांदा सोडत काढली जाईल.

प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक १२ येथील गृह प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारण्यात आली. या गृह प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ३३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १५६६ सदनिका आहेत. दरम्यान, या ठिकाणी जवळपास साडेपाचशे घरे रिकामी आहेत. त्यासाठी देखील नव्याने सोडत काढली जाणार आहे. यातून देखील घरे शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी खुली असून, पहिले येतील त्यास घरे देण्यात येतील.

याचबरोबर दोन्ही ठिकाणी २३ दुकाने देखील शिल्लक आहेत. सदनिकांसमवेत ही दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२२ दरम्यान सोडत काढली होती. त्यानंतर अद्यापही घरे रिकामी आहेत. त्यामुळे आता या घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी मागवला आहे.

 

सदनिकांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या गृह प्रकल्पाच्या किमती या त्यावेळेस म्हणजेच २०१२-१३ या दरम्यान ठरलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये त्याचा आढावा घेण्यात. मात्र, त्यांच्या वाढीव दराबाबत अद्याप निश्चितता नाही.

- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest