पाणी वाटपाचा निर्णय तूर्त लांबणीवर; 'या' दिवशी समिती घेणार निर्णय

जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाची आपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे. त्यामुळे पाणी वाटपाबाबतच्या शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. परंतू पावसाळ्याचा एक महिना शिल्लक असल्याने पुढील महिन्याभरातील परिस्थिती पाहून १५ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातील पाणी वाटपाबाबतचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 3 Sep 2023
  • 02:34 pm
water distribution

water distribution : पाणी वाटपाचा निर्णय तूर्त लांबणीवर; 'या' दिवशी समिती घेणार निर्णय

पावसाचा एक महिना शिल्लक असल्याने पाणीसाठ्याची स्थिती पाहून १५ ऑक्टोबरला कालवा समिती निर्णय घेणार

पुणे: जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाची आपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे. त्यामुळे पाणी वाटपाबाबतच्या शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. परंतू पावसाळ्याचा एक महिना शिल्लक असल्याने पुढील महिन्याभरातील परिस्थिती पाहून १५ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातील पाणी वाटपाबाबतचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील कालवा समितीची बैठक झाली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतुल कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जलसंपदाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

यंदा पावसाचे आगमन जूनमध्ये उशिरा सुरू झाले. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात चांगली हजेरी दाखविली. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने शहरासह राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा हा २७.५५ टिएमसी इतका झाला आहे. याची टक्केवारी एकूण ९४.५० इतकी आहे. हा धरणसाठा शंभर टक्के होण्यासाठी आणखी दोन टीएमसी इतके पाणी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणे आपेक्षित आहे. पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणे पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी मुठा नदीत सोडले जाते. हे पाणी पुढे उजनी धरणाला जाऊन मिळते. यंदा खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले असले तरी हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी आले नाही. त्यामुळे पुणेकरांवर आता पाणी कपातीचे संकट येते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या पाणी कपातीबाबत बोलण्याचे टाळले.

दरम्यान, शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. पावसाळ्याचा अद्यापही एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे तूर्तास कुठलाही निर्णय घेण्याची गरज नाही. १५ ऑक्टोबरला पुन्हा कालवा समितीची बैठक घेउन त्यामध्ये निर्णय घेण्याची भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

सध्याचा पाणीसाठा : (टक्क्यांमध्ये)

- खडकवासला : 56.22 टक्के

- पानशेत : 100 टक्के

- वरगवांव : 100 टक्के

- टेमघर : 80.03 टक्के

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest