संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील कांबळे यांनी कोविड काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांना मदत केली, यामुळे नागरिक त्यांना आरोग्यदूत म्हणून संबोधतात, या आरोग्यदुटाने सामान्य नागरिकांसोबतच आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्यांनाही वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नवीन वसाहत इमारत निर्मिती काम सुरू झाले आहे.
पुण्यातील ससुन सर्वोपंचार रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या साथीने रुग्णाला जीवदान देणाऱ्या, अहोरात्र रुग्णांसाठी झटणारे रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा तेवढेच मेहनती असतात. मात्र या चतुर्थ श्रेणी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता असलेली वसाहत अतिशय जीर्ण झालेली होती. आमदार सुनील कांबळे यांच्या पाठपुराव्याने आता या इमारतीचे स्वरूप बदलून तळमजला ( पार्किंग ) सह पाच मजली इमारत उभी रहात आहे. नवीन इमारत बांधणीचा सुमारे 28.23 कोटी रुपये पर्यंतचा प्रस्ताव आमदार कांबळे यांनी मंजूर करून घेतला. यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स , कार्यालयातील कर्मचारी यांकरिता सोमवार पेठ पुणे येथे अत्याधुनिक सोई सुविधा युक्त निवासस्थानाची सोय होणार आहे.
ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीचे काम पूर्ण
ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विधानसभा सत्रामध्ये विशेष मागणी करून सुनिल भाऊंनी विशेष निधीची तरतूद करून घेतली आणि हे बांधकाम पूर्ण करून घेतले. तसेच कोविड काळात हे हॉस्पिटल रुग्णांसाठी खुले करून घेतले.
आम्ही 1999 पासून सोमवार पेठेतील ससुन कर्मचारी वसाहतीत रहात आहे. ही वसाहत 1992 मध्ये निर्माण झाली होती. या वसाहतीत 120 कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहेत, या इमारती जीर्ण झाल्याने आम्हाला वसाहत सोडण्यास नोटिस देऊन सांगण्यात आले, आमच्या पुनर्वसनांची कोणतीही सोय करण्यात आली नाही. ससुन कर्मचारी वसाहत बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही कॉँग्रेस च्या काळात मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता मात्र आम्हाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आमदार सुनील कांबळे यांनी 2019 साली या प्रकरणात लक्ष घातले आणि आज आमचा प्रश्न सुटला आहे.
संजय नारायण निमजाते, रहिवाशी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.